महिला दिन
प्रशांत दांडेकर
दुर्गा ही मीच, सरस्वती ही मीच,
मीच आहे अन्नपूर्णा आणि लक्ष्मी ही मीच
ओळख माझी ही भारी
म्हणूनच नारी आहे न्यारी!!
चंदनापरी झिजते मी
संस्कार सर्वांना देते मी
परी माझ्या सभोवती
नेहमी सर्पाचा विळखा
सबला जरी असले तरी
हाक माझी वेळीच ओळखा!!
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
सचिन फडणवीस
अंबिके जगदंबिके
मही तू अंबालिके,
चरण शरण तव माये
सृजनशक्ती तू गे बालिके!!
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
प्रीती कामत-तेलंग
मला नको पूजा शोभेच्या मखरातली,
मी मानुषी, मी ऊर्जा तुमच्या घराघरांतली..
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
डॉ.तृप्ती लोणकर
नाही मी सीता,नाही मी झाशीची राणी
जिजाऊची लेक,मीच तुझ्या भविष्याची राणी
आई मी मुलांची,बहीण आहे भावांची
विसरतोस कसा मीच ऊर्जा तुझ्या जीवनाची
नाही मी सीता,नाही मी झाशीची राणी
जिजाऊची लेक,मीच तुझ्या भविष्याची राणी!!
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
ऋतुजा कुलकर्णी
नको साडी चोळी नको ऐशोआराम
नको देऊ दागिना पण ठेव उचित सन्मान
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
डॉ.निखिल पाठक
आई घरातल्यांसाठी स्वयंपाक करते; पण फक्त स्वयंपाक करण्यासाठी म्हणून आई नसते.
#सन्मान_स्त्रीत्वाचा
पहिला कोंब उमलतो - मातीतून
जन्मभर पोषण - मातीतूनच
शेवटी मिसळणार - ते ही मातीतच!
मग कायम मातीचा अनादर का??
#सन्मान_स्त्रीत्वाचा
एकवेळ डोक्यावरचं आभाळ हरवलं, तरी पायाखालची जमीन
शाबूत असेपर्यंत नवीन क्षितिजे शोधण्याची उर्मी कायम असते.
पण तीच जमीन जर कंपायमान झाली तर????
जमिनीला गृहीत धरू नका.
#सन्मान_स्त्रीत्वाचा
बाळाच्या पोटातली भूक आईला न सांगता कशी कळते, हे कळण्यासाठी यासाठी आईच्या डोळ्यातूनच बाळाकडे पहावे लागते!
#सन्मान_स्त्रीत्वाचा
इतर लोकं स्त्रियांचा सन्मान करतील तेव्हा करो, पण एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा ती पण आपल्यासारखीच स्त्री आहे, म्हणून सन्मान केला तर!!
#सन्मान_स्त्रीत्वाचा
सखी, जरा ऐकशील?
व्यापामधून उसंत घेऊन
थोडा वेळ देशील?
त्यांनी तुला बांधून ठेवलं,
पण बांधू कुणी दिलं?
तुला शोभेसाठी वापरलं,
पण वापरू कुणी दिलं?
तुझ्या खांद्यावर ओझं लादलं,
लादू कुणी दिलं?
तुला सतत गृहीत धरलं,
असं धरू कुणी दिलं?
सरतील दिवस - रात्र - महिने
- वर्षे - दशके - शतके..
तुझे अवमान सुरूच राहतील,
तू म्हणशील तितके..
तुझे मूल्य ओळखण्यासाठी
स्वतःकडे बघशील?
कधीतरी, स्वतःकडे
माणूस म्हणून बघशील??
#सन्मान_स्त्रीत्वाचा
Comments
Post a Comment