अभिसार मराठी-गोंदण,गात्रात उसळली

अभिसार मराठी

गोंदण

कशी ही भूल तुझी
हे सावळ्या मुकुंदा
स्तन हे उभारले
नाव तुझे गोंदता

फुलल्या कंच कळ्या
बहरल्या लाज लाजून
तुझीया स्तव सज्ज या
मधुर रसात न्हावून

सजला महाल हा
ये जवळ असा प्रिया
प्राशुन घे सर्व या
मदनबाणी कुंदकळ्या...

मृणाल पाटोळे
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

गात्रात उसळली हवीहवीशी आग
अंगांगावर रोमांच मनी अनुराग
हृदयात स्पंदने जलद तप्तसे वारे
हे तुझ्यासवेही असेच होते का रे?

अनाघ्रात या दोन कळ्या उमलून
पाहती वाट तव स्पर्शाची लाजून
ओंजळीत त्यांना सांग कधी भरशील?
कामना मनाची तृप्त कधी करशील?

आतुरल्या देही विलंब सोसत नाही
ही शय्या तुजविण मला सुखावत नाही
गुंफुनी हात हातात श्वास श्वासात
घेशील कधी हे अधर तुझ्या अधरात?

डॉ.निखिल पाठक

#अभिसारमराठी
#मराठीकोट्स

Comments

Popular posts from this blog

महिला दिन